आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीची कमतरता नाही, लेट-लतीफ अधिकाऱ्यांवर वचक ठेवावाच लागतो : गडकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- येत्या वर्षभरात इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक बस आणि इतर वाहने बायोफ्युएलवर आणून भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलचा बँडबाजा वाजविणार आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. 
 
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात आले होते. चांदणी चौकातल्या नियोजित उड्डाणपुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूक समस्येवर बोलताना अधिकारी काम करत नसल्याने ही अवस्था झाली आहे. पैसे पडून आहेत, मात्र अधिकारी वेळेवर कामं करत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मुळा-मुठा नदीत काम करायला राज्य सरकारने एनओसी द्यावी, ड्रायपोर्ट बांधून वाहतूक सुरु करु. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, असे गडकरी म्हणाले. 

पुण्याचा विकास हवा असेल,  तर त्याचा आराखडा एखाद्या बाहेरच्या एजन्सीला सोबत घेऊन करुन घ्या, तरच पुण्याचा विकास शक्य आहे, असे गडकरींनी सांगितले. 

प्रदूषण रोखण्यासाठी पाण्यावरुन गेले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग दुप्पट केले आहेत. 10 नद्यांचा जलमार्ग बनवण्यात येत आहेत. शिवाय गंगेत विमान उतरवले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.

पुण्यासाठी आता पायलट प्रोजेक्ट करायला तयार आहे. फक्त जागा मिळाली पाहिजे. आता रस्ते मोठे करता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान  पुणे-सातारा मार्गावर शिंदेवाडी जवळ एसटी बस, ट्रक आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 जण जखमी झाले. गडकरी याचा कार्यक्रम सुरु असतानाच हा कात्रज परिसरात हा अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...