आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident To Pune Duronto Express Near Monkey Hill

खंडाळा घाटात दुरांतो एक्‍स्‍प्रेसवर कोसळली दरड, सुदैवाने भीषण अपघात टळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खंडाळा घाटात पुण्‍याकडे जाणा-या निजामुद्दीन-पुणे दुरांतो एक्‍स्‍प्रेसच्‍या इंजिनावर दरड कोसळल्‍यामुळे अपघात झाला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, पुण्‍याकडे जाणारी वाहतूक काही तास पूर्णपणे ठप्‍प होती. सकाळी सव्‍वा नऊच्‍या सुमारास वाहतूक हळूहळू सुरु करण्‍यात आली.

खंडाळा घाटात मंकी हिलजवळ हा अपघात झाला. दरड कोसळल्‍यामुळे इंजिन बंद पडले. परिणामी पुण्‍याकडे जाणारी वाहतूक 4 ते 5 तास बंद होती. घाटात चढाव असल्‍यामुळे गाडी हळू होती. त्‍यामुळेच भीषण अपघात झाला नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्‍वेच्‍या बचाव पथकाने इंजिन गाडीपासून वेगळे केले. ठाकूरवाडीपर्यंत मागे नेण्‍यात आली. त्‍यानंतर डाऊन मार्गाने पुण्‍याकडे रवाना करण्‍यात आली. दरड कोसळलेल्‍या ठिकाणी माती काढण्‍याचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते. रेल्‍वेच्‍या पदाधिका-यांनी रेल्‍वे ट्रॅकची पाहणी केली.