आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अपघातात दररोज एकाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू महामार्गावर सर्वाधिक ब्लॅक स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रीनगर येथील महादेवभाई देसाई चौकात युवतीचा अपघात झाल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात सर्वाधिक अपघात होणारी 36 ठिकाणी शोधली आहेत. - Divya Marathi
शास्त्रीनगर येथील महादेवभाई देसाई चौकात युवतीचा अपघात झाल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात सर्वाधिक अपघात होणारी 36 ठिकाणी शोधली आहेत.
पुणे- शास्त्रीनगर येथील महादेवभाई देसाई चौकात डंपरखाली येऊन युवतीला प्राण गमवावे लागल्यानंतर आता शहरात दररोज अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. या वर्षी केवळ 8 महिन्यातच अपघातात 242 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 492 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
 
मंगळवारी (दि. 17) एकाच दिवशी शहरातील विविध भागांत 3 जणांना प्राण गमवावे लागले. कोंढव्यात उंड्री चौकात कंटेनरने धडक दिल्याने 20 वर्षीय युवती, पीएमपीच्या धडकेत चंदननगरला 21 वर्षीय तरुण आाणि ट्रकच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.
वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट 2017 पर्यंत शहरात 1 हजार 47 अपघातांची नोंद झाली होती. शहरात दररोज जवळपास 5 अपघात होत आहेत. त्यात 242 जणांचा मृत्यू झाला तर 492 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात सर्वाधिक जीवघेणे अपघात झाले. त्यात 40 जणांचा मृत्यू झाला. तर 93 जण गंभीर जखमी झाले. शहरात सातत्याने जीवघेणे अपघात होणारी 36 ठिकाणे आहेत. त्यात सर्वाधिक 9 ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...