आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस स्‍टेशनमध्‍येच आरोपीने केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न, पुण्‍यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-  पुणे-मुंबई महामार्गावर दरोडा आणि लूटमार करणाऱ्या आरोपीने पोलीसस्टेशनमधेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक पुण्‍यात शनिवारी रात्री घडली. देहूरोड पोलीस स्‍टेशनमध्‍ये ही घटना घडली असून अविनाश खंडागळे असे या आरोपीचे नाव आहे. आता आरोपीची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  
 
द्रुतगती मार्गावर प्रवाशांना लूटणाऱ्या टोळीचा तळेगाव पोलिसांनी तीन तासात पर्दाफाश केला होता. अविनाश त्यामधीलच एक आरोपी आहे. तळेगाव पोलिसांनी त्‍याला अटक केली होती.  

आरोपीवर बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्‍याच्‍यासोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींवर बुलडाणा आणि अहमदनगरमध्ये बलात्कार, दरोडा आणि शस्त्र विक्रीचे असे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...