आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त कागदाेपत्री सहकारी संस्थांची ‘दुकानदारी’ बंद!, एक जुलैपासून साफसफाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केवळ कागदोपत्री सुरू असलेल्या सहकारी संस्था बंद करण्यासाठी सहकार विभाग येत्या १ जुलैपासून मोहीम सुरू करत आहे. कार्यरत नसलेल्या आणि आर्थिक हिशेब नियमितपणे सादर न करणाऱ्या सहकारी संस्थांची छाननी करण्याचे काम पुढील तीन महिने चालणार आहे.

राज्यात विविध ५४ प्रकारच्या तब्बल २ लाख ३० हजार नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक ताळेबंद आणि नियमिततेतीच पाहणी होणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ही माहिती दिली.

‘सुमारे ४० टक्के सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नियमितपणे मिळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संस्था नोंदणीकृत असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यरत नसण्याची शक्यता आहे. या संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अनेक सहकारी संस्था लेखापरीक्षण करत नसल्याचेही उघड झाले अाहे. ‘ई-सहकार’ या संकेतस्थळावर सर्व सहकारीस संस्थांना त्यांची माहिती देण्यास सांगितले होते. ती देण्यात आलेली नाही. ‘ई-सहकार’वर सहकारी संस्थांना त्यांचे वार्षिक रिटर्न्स पाठवणे बंधनकारक असते. यातही चालढकल झाल्याचे आढळल्याचे दळवी म्हणाले.
अशी होणार कारवाई
राज्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी जाऊन सहकार खात्याचे पथक पाहणी करणार
नोंदणीकृत पत्त्यावर न आढळणाऱ्या किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही त्या संस्था बंद असल्याची खातरजमा केली जाणार.
ज्या संस्थांकडे शासकीय अर्थसाहाय्य आहे अशा संस्था अवसायानात काढण्यापूर्वी ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय होणार.
ज्या संस्थांकडे मालमत्ता नसेल किंवा आर्थिक व्यवहार व कोणतेही येेणे-देणे नसेल तर संस्था तातडीने अवसायानात काढणार. त्यानंतर नोंदणी रद्द होणार.
बातम्या आणखी आहेत...