आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलितांच्या संरक्षणात दिरंगाई करणा-या दोषी पोलिसांवर कारवाई करा : रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - दलित कार्यकर्त्याची हत्या होणे ही चीड आणणारी गोष्ट आहे. चंद्रकांत गायकवाडचा खून करणा-या आरोपींची नावे पोलिसांकडे आहेत, त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी जांब (ता. इंदापूर) येथे केली. तसेच दलितांच्या संरक्षणात दिरंगाई करणा-या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आठवले यांनी गुरुवारी जांब येथे येऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना रिपाइंच्या वतीने एक लाखाची मदत देण्याचे आश्वासनही दिले.आठवले म्हणाले की, दलितांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा उभारण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक दर्जाचा अधिकारी तर प्रत्येक पोलिस ठाण्यात आठ-दहा पोलिस नेमावेत. ग्रामीण भागामध्ये गावठी पिस्तूल वापरण्याचे प्रकार सर्रास होत असून ते चिंताजनक आहे. पोलिसांनी याबाबत गांभीर्याने कारवाई करून समाजातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

पाठीशी घालणार नाही : देशमुख
पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनीही पीडितांचे सांत्वन केले. ‘दलितांवर अत्याचार करणा-यांना पाठीशी घालणार नाही. दोषी पोलिसांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल. तसेच पीडितांना शासनातर्फे घरकुल दिले जाईल, मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.