आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तचे तुरुंगातच सिक्स पॅक अॅब्स, लिफाफे बनवून कमावतो रोज 45 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कैदेत असलेला अभिनेता संजय दत्तने पुण्याच्या येरवडा तुरुंगात सिक्स पॅक अॅब्स बनवले आहे. ११४ दिवसांची शिक्षा माफ झाल्यामुळे संजय दत्त पुन्हा चर्चेत आला आहे. २१ मे २०१३ पासून साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेलेला संजय फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्याला आतापर्यंत २९३ दिवसांची रजा मिळालेली आहे. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली आहे. परंतु, संजयला आता तुरुंगातील नियमांची सवय झाली आहे. रोज दुपारनंतरचा काळ तो योग आणि ध्यानधारणेत घालवत आहे. दरम्यान, तुरुंगातही त्याने व्यायामावर विशेष लक्ष दिले आहे. यातूनच त्याच्या शरीरयष्टीने "सिक्स पॅक अॅब्स'चे रूप घेतले आहे. संजयला तुरुंगात कागदाच्या पिशव्या बनवण्याचे काम देण्यात आले असून त्यासाठी त्याला ४५ रुपये रोज मिळतो. दरम्यान, तो अन्य कैद्यांचेही भरपूर मनोरंजन करत असतो. तुरुंगाच्या कम्युनिटी रेडिओवर तो निवेदक म्हणूनही काम करत आहे. त्याला तुरुंगातील विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस तैनात केले आहेत. दरम्यान, वारंवारच्या रजा आणि शिक्षेत सूट देण्यावरून बराच वाद झाला आहे. त्यावर पश्चिम विभागाच्या तुरुंग उपमहासंचालक स्वाती साठे या सांगतात, तुरुंगातील नियमांचे पालन, गोंधळ किंवा अन्य कृत्य न करणे, दिलेली कामे प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कैद्याची वर्तणूक चांगली मानली जाते. या चांगल्या वागणुकीच्या बदल्यात कैद्याच्या शिक्षेत सूट देण्याचा अधिकार तुरुंग अधिकाऱ्यास आहे.
संजय दत्तवर कोणतीही विशेष कृपा नाही. बहुतांश कैद्यांना अशी सवलत मिळते. काही कैद्यांना वाईट वर्तणुकीमुळे सवलती मिळत नाहीत. पूर्ण शिक्षा भोगावी लागते.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे तुरुंग अपर पोलिस महासंचालक