आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री अरुणा भट यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा भट (वय ६४) यांचे बुधवारी दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे बहिणी आणि भाऊ असा परिवार आहे. अभिनेत्री रजनी भट या त्यांच्या भगिनी होत.

अरुणा भट यांना चार दिवसांपूर्वी डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाले. डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, लग्नाची बेडी, नवऱ्याची धमाल बायकोची कमाल, बायको नसावी शहाणी, तुझे आहे तुझ्यापाशी, सूनबाई, घर तुझेच आहे, राजकारण गेलं चुलीत, नाथ हा माझा आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी अधिक ठसा उमटवला.

दादा कोंडके यांच्या काही चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. अवंतिका या गाजलेल्या मालिकेतही त्यांनी काम केले होते. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणीवर त्यांनी पाच वर्षे काम केले होते.