आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उध्दवांच्या फोटोग्राफीवर बोलता, तुमच्या रात्रीच्या छंदाचे काय? भाऊजींचा राजवर प्रहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फक्त आवाज आणि नुसताच धूर असे काही पक्षाचे झाले आहे. त्या धुरात त्यांनाच गुदमरायला लागले आहे. मात्र, काचेप्रमाणे पारदर्शक असणे, हेच शिवसैनिक आणि शिवसेनेच्या उमेदवाराचे चरित्र आहे, असे मत शिवसेना नेते आणि प्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. उध्दव साहेबांच्या फोटोग्राफीच्या छंदावर काही लोक बोलतात. मात्र, तुमच्या रात्रीच्या छंदाचे काय, असा सवाल त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना केला.
मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ निगडी-आकुर्डी गाव येथे बांदेकर यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्रीरंग बारणे, मच्छिंद्र खराडे, बाबासाहेब धुमाळ, उमा खापरे, सदाशिव खाडे, भगवान वाल्हेकर उपस्थित होते.
आदेश बांदेकर म्हणाले, शिवसेनेकडे हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा भगवा आहे. फक्त शिवसैनिकच नजरेला नजर भिडून उत्तर देऊ शकतो. जे बोलतो तेच करतो. व्यवसायात राजकारण आणि राजकारणात व्यवसाय करणार नाही. सध्या फक्त आवाज आणि नुसताच धूर असे काही पक्षाचे झाले आहे. त्यात धुरात तेच गुदमरायला लागलेत. पारदर्शक असणे हेच शिवसैनिक आणि शिवसेनेत्या उमेदवाराचे चरित्र आहे. मोठी पदे उपभोगल्यानंतर पक्षात सामान्य कार्यकर्त्याच्या जिवावर मोठ झाल्यानंतर काही पक्ष सोडून जातात. त्यांनाही आता आम्ही सोडणार नाही. मुळात शिवबंधन तोडून गेलेल्यांच्या नशीबात त्याचे पावित्र टिकवणे नव्हते, असे म्हणत खासदार गजानन बाबर यांच्यावर बांदेकर यांनी जोरदार टीका केली. मतभेद, तुटीफुटीचा राजकारणाचा डाव आणि आर्थिक प्रलोभने दाखवली जातील. परंतु, त्यांना बळी न पडता फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लक्ष ठेवायचे. कारण, महागाई, भ्रष्टाचार आणि असुरक्षितता निर्माण करणा-या रावणांना मारण्यासाठी रामाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
बारणे म्हणाले की, मतदारराजा आपलाच आहे ही भावना काहींची झाली आहे. विधानसभेत कायदे होताना असताना इथले आमदार झोपा काढतात. अपक्ष निवडणूक लढवणा-या आमदाराने विधान परिषद आणि विधान सभेच्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत फक्त जांभया द्यायला तोंड उघडले. लोकांचे प्रश्न मांडले नाहीत. राजीनाम्याची नाटकं करून आता हेच प्रश्न केंद्रात जाऊन सोडवण्याच्या भूलथापा मारतात. मतदार सुजान आहे, त्यांने त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले.
शहरात गुंडगिरी फोफावत चालली आहे. साधं महिलाचे मंगळसूत्र सुरक्षित नाही. युती सरकारच्या काळात गुन्हेगारी कमी झाली होती. पण, सध्या सत्ताधारी मंडळी गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचं काम करतात. मात्र, कोट्यवधींची भाषा बोलणा-यांनी कोट्यवधीचे मतदार माझ्याबरोबर आहेत, हे विसरू नये. मतदारांनी भूलथापा देणा-या आणि शिवसेनेत सत्तेची फळे चाखून तीच दुस-याला देणा-यांनाही त्यांची जागा दाखवून द्या. सटर-फटर चिन्हावर नाही, तर फक्त शिवधनुष्यावर मतदान करून तुमच्या हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवा, असे आवाहनही बारणे यांनी केले.
पुढे वाचा, राज यांच्या रात्रीच्या छंदाचे काय...