आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adivasi Reservation News In Marathi, Sharad Pawar, Divya Marathi

आदिवासींचे आरक्षण काडीभरही कमी होणार नाही- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - आदिवासींचे आरक्षण काडीभरही कमी होणार नाही, धनगर समाजाची मागणी लोकशाहीत दुर्लक्षित करून चालणार नाही, असे मत राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले.
पवार म्हणाले, धनगर समाजाचे प्रमुख मुख्यमंत्री व मला भेटले. त्या वेळी आदिवासींचे आरक्षण काढून घेण्याची त्यांनी भाषा केली नाही.
आदिवासींचे आरक्षण काडीभरही कमी होणार नाही. आरक्षणाची मागणी केंद्र सरकारकडे पाठवण्याची जबाबदारी टाळून लोकशाहीत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने ऐक्याची व सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. सामाजिक ऐक्य ठेवण देशाची व महाराष्ट्राची गरज असल्याचे ते म्हणाले.