आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी सल्लागाराकडेच सुदाम मुंडेंचे वकीलपत्र, साळुंकेंना हटवण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीतील साेनाेग्राफी तज्ज्ञांवर कायद्याचा बडगा उगारून त्यांच्यावर खटले दाखल करण्याची जबाबदारी पालिकेचे विधी सल्लागार अॅड. मिलिंद साळुंके यांच्यावर अाहे. मात्र याच साळुंके यांनी परळीतील बहुचर्चित स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात अाराेपी असलेले डाॅ. सुदाम मुंडे यांचे वकीलपत्र घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे साळुंके यांची विधी सल्लागार पदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी पुणे रेडिअाॅलाॅजिस्ट व साेनाेग्राफी तज्ज्ञ व डाॅक्टरांच्या शिष्टमंडळाने महापाैर दत्तात्र्य धनकवडे व महापालिका अायुक्त कुणालकुमार यांच्याकडे केली अाहे.

‘अायएमए’च्या पुणे शाखेच्या विधी विभागाचे प्रमुख डाॅ.जयंत नवरंगे यांनी सांगितले की, ‘पालिकेच्या विधी सल्लागाराने अनेक दाेषी अधिकाऱ्यांना न्यायालयातून साेडवले असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध अाहे. एकीकडे प्रामाणिक डाॅक्टरांना िकरकाेळ कागदाेपत्री चुकांसाठी न्यायालयात खेचायचे अाणि दुसरीकडे अाराेपी डाॅक्टरांचे वकीलपत्र घ्यायचे हे न्यायाला धरून नाही. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवार्इ करून त्यांना पदावरून हटवण्यात यावे.’
कठाेर कारवाई करणे टाळा
महापाैर रुग्णांची माहिती संकलित करताना झालेल्या किरकोळ कागदाेपत्री चुकांसाठी पुण्यातील रेडिअाेलाॅजिस्ट व साेनाेग्राफी तज्ज्ञांच्या विराेधात जाचक व कठाेर कारवाई करण्याएेवजी त्यांना फक्त समज द्यावी, अशा सूचना या वेळी महापाैरांनी महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैशाली जाधव यांना दिल्या अाहेत.