आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • African Held With 151 Gm Cocaine Worth 15.84 Lakh In Pune

पुण्यात नायजेरियन तस्कराकडून 16 लाखांचे कोकेन जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
पुणे- पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीतील तरुण तरुणींना कोकेनचा पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका नायजेरिन तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरीफ मोहमंद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या वेळी त्याच्याकडून 15 लाख 84 हजार रुपयांचे 151 ग्रँम कोकेन जप्त करण्यात आले. पुण्यातील विमाननगर, कोरेगावपार्क, कल्याणीनगर, लष्कर, एम. जी. रस्ता, वानवडी या उच्चभ्रु भागात तरुण-तरुणींना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यात येत होता.

याप्रकरणी मागील दोन महिन्यापासून पोलिसांचे पथक गुप्तपणे तपासणी करत होते. दरम्यान, अंमली विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी अविनाश शिंदे यांना माहिती मिळाली की, कोंढाव्यातील एनआयबीएम रस्त्यावर एक नायजेरीन नागरिक लष्कर परिसरात कोकेनची मोठी डिलिंग करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली.