आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 1 May There Is No Muharta For Marriage Next Two Months

शुक्राच्या अस्तामुळे लग्नसराईला मे-जूनमध्ये \'ब्रेक\'! आता जुलैची वाट पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दरवर्षी शाळांना सुटी लागल्यानंतर लग्नाचे मुहूर्त काढले जातात. यंदा 1 मे नंतर शुक्राच्या अस्तामुळे लगीनघाईला "ब्रेक' लागणार आहे. 1 मे नंतर मुहूर्तच नसल्याने मे जून महिन्यात दरवर्षी असणारी लगीनघाई यंदा पाहायला मिळणार नाही. त्यामुळे हे दोन महिने सुटीचे असूनही लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या वधू-वरांना जुलै महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
दरवर्षीचे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे लगीनघाईचे दिवस असतात. तसे पाहिले तर जानेवारीपासूनच लग्नाच्या तारखा काढल्या जातात. एप्रिल महिन्यापासून लगीनघाईला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास 36 मुहूर्त होते. परंतु शाळेला सुटी लागल्यानंतर, मुलांची परीक्षा झाल्यानंतर लग्न मुहूर्ताचा विचार साधारणपणे सगळीकडे केला जातो. एप्रिल महिन्यातही जवळपास नऊ मुहूर्त होते. या मुहूर्तांवरही अनेकांचे शुभमंगल झाले. या महिन्यातील आज आणि उद्या (29, 30 एप्रिल) या तारखांचे मुहूर्त साधण्यासाठीही धावपळ सुरू आहे.
मे महिन्यात निवांत पाहू म्हणणाऱ्यांची मात्र यावेळी पंचाईत झाली आहे. मे महिन्यात 1 मे हाच एक मुहूर्त असल्याने यादिवशी सायंकाळपर्यंत असणा-या मुहूर्तावर अनेकजण बोहल्यावर चढणार आहेत. पुन्हा जून महिन्यात मुहूर्त नसल्याने आता दोन महिन्यांचा मोठा 'गॅप' पडणार आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यंदाच्या लगीनसराईच्या आशेवर असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार आहे.
भर उन्हाळ्यातही केवळ लग्नसराईच्या खरेदीसाठी फुलणा-या बाजारपेठा यंदा ओस पडलेल्या दिसल्या तर नवल वाटू नये. मे जून या दोन महिन्यांत लग्न मुहूर्त नसल्यामुळे लग्नावेळी रस्त्यावर होणारी गर्दी दिसणार नाही. डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, बँडबाजाची धामधूम, मंगलाष्टकांचे सुमधुर सूर कानी पडणार नाहीत, हेही तितकेच खरे.

जुलै 2016 पासून वर्षअखेरीस आहेत एकूण 50 विवाह मुहूर्त... वाचा व पाहा पुढे....