आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार-फडणवीसांमध्ये डाळीवरून ‘तडका’, सीएमनीही केली पवारस्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवार, फडणवीस आणि खडसे बॅटरीच्या कामधून एकत्र कार्यक्रमासाठी गेले. - Divya Marathi
पवार, फडणवीस आणि खडसे बॅटरीच्या कामधून एकत्र कार्यक्रमासाठी गेले.
बारामती - पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापाठाेपाठ बारामती दाैऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याची जाहीर स्तुती केलीच; परंतु डाळीच्या दरवाढीवरून उद‌्भवलेल्या प्रश्नाबाबत पवारांनी लगावलेल्या टाेल्याला चाेख प्रत्त्युत्तर देत या प्रश्नाचे खापरही मुख्यमंत्र्यांनी अाधीच्याच अाघाडी सरकारवर फाेडले.
माळेगाव (ता. बारामती) येथे कृषिविकास प्रतिष्ठानतर्फे ‘कृषक २०१५’ या प्रात्यक्षिकावर आधारित कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शुक्रवारी पवार व फडणवीस एका व्यासपीठावर अाले हाेते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतीक्षेत्रातील पवारांच्या सकारात्मक कार्याचे काैतुक केले. ‘पवार कुटुंबीयांनी शेतीक्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. चांगले प्रयाेग करणाऱ्या शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी बारामतीत कृषी विज्ञान केंद्र स्थापन केले, त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला,’ असे गाैरवाेद‌्गारही काढले.

तूरडाळीच्या मुद्द्यावरून पवारांनी फडणवीस सरकारला अप्रत्यक्ष जबाबदार धरत त्यांना सल्ला देण्याचाही प्रयत्न केला. ‘तीन वर्षांत महाराष्ट्र डाळींच्या उत्पादनात अव्वल होता. अाताही शेतकऱ्यांना डाळीचे चांगले वाण व भाव मिळाल्यास सध्या सणासुदीच्या दिवसांत रंगणारी तूरडाळीची चर्चा थांबू शकते,’ असे मत पवारांनी व्यक्त केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हजरजबाबीपणे उत्तर दिले.

फडणवीस- शहांमध्ये चर्चा
नवी दिल्ली | अार्थिक परिषदेनिमित्त शुक्रवारी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या दाेघांमध्ये सुमारे अर्धा तास राज्यातील राजकीय घडामाेडींवर चर्चा झाल्याची माहिती अाहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील सरकारचीच चूक
^मागील सरकारने याेजना अाखून शेतकऱ्यांना तूर पेरण्यास सांगितले. मात्र अाश्वासन देऊनही नंतर नाफेडने तुरीची खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी नंतर तूरडाळीच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली. डाळ उत्पादनही घटले. सरकारच्या योजनांमध्ये सातत्य नव्हते. टंचाई निर्माण झाल्यावर योजना अाखल्या जात हाेत्या. यापुढे मात्र सातत्याने दीर्घकाळापर्यंत याेजना राबवल्या जातील. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राजकीय सहिष्णुतेचे मराठमोळे चित्र!
देशात सध्या असहिष्णुता वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. लेखक, साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक, चित्रपट कलावंत या असहिष्णुतेच्या निषेधार्थ त्यांना मिळालेले राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार परत करत आहेत. या असहिष्णू वातावरणातही महाराष्ट्रातील ‘राजकीय सहिष्णुतेचेे’ चित्र शुक्रवारी बारामतीत पाहायला मिळाले. कृषी प्रदर्शनाच्या उद‌्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅटरीवर चालणाऱ्या कारमधून आले. पुढच्या सीटवर बसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांचे सारथ्य केले. सोबत कृषिमंत्री एकनाथ खडसेही होते.
डाळीला चांगली किंमत हवी
आठ वर्षांपूर्वी आपण कापूस, गहू आयात करत होतो. आता गहू, कापूस निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक आहे. तूरडाळ व तेलबिया वगळता भारत इतर शेतीमाल निर्यात करतो. कष्टाळू शेतकरी व शेती शास्त्रज्ञांच्या पाठीशी सरकार उभे राहिल्यानेन देश अन्नदाता बनला. मात्र डाळी व खाद्य आयात थांबवण्यात अापण कधी यशस्वी होणार? तीन वर्षांपूर्वी डाळीच्या उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. चांगले वाण, डाळवर्गीय शेतमालाला चांगली किंमत दिली तर महाराष्ट्रातील शेतकरी डाळवर्गीय पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन सणासुदीला होणारी डाळीची चर्चा थांबवू शकतो. तसेच परदेशी डाळींवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस