आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Oye Oye We Stop, Eminant Lyrics Anand Said

‘ओये ओये’चा जमाना येताच आम्ही थांबलो! प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हिंदी चित्रपटांचे गीतकार, संगीतकार, गायक, वादक, नट, दिग्दर्शकांना गीतांतील काव्याची जाण होती. एका क्षणी ‘ओये ओये’ असे गाणे पुढच्या पिढीने दिले. ते लोकप्रिय झाले व ‘हीच थांबण्याची वेळ आहे’ हे ओळखून संगीत देणे थांबवले. गीतांतील काव्य हरपले. ऱ्हिदम उरला तेव्हाच आपला काळ संपल्याचे समजले. मात्र, त्याची खंत नाही, असे मत संगीतकार आनंदजी यांनी व्यक्त केले.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आनंदजी यांना एस. डी. बर्मन स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यापूर्वी ते बोलताना ते म्हणाले, आम्ही मूळ गुजरातचे व्यापारी.
स्वच्छ भाषेत बनिये. मुंबईतील गिरगावात मराठमोळ्या वातावरणात राहिलो. अभ्यासात फार रमलो नाही; पण कॉलेजमध्ये तेव्हाच्या गीता दत्त, हेमंतकुमार, मन्नादा, तलत मेहमूद यांना घेऊन अनेक कार्यक्रम केले. आम्ही भाऊ असल्याने ‘इगो’चा प्रश्न उद्भवला नाही. लतादीदींची सर्वाधिक सोलो गाणी आम्ही केली याचा अभिमान वाटतो. त्या अद्वितीय गायिका आहेत, असे गौरवोद‌्गारही आनंदजी यांनी काढले.

गाण्यांच्या जन्मकथा
> माझा मित्र रुग्णालयात गेला तेव्हा माझ्या ओठांवर नकळत आलेले शब्दच नंतर गाणे बनले. ते होते, ‘ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना’
> एकदा बायको साडीत समोर आली आणि म्हणाली, ‘कशी दिसते आहे?’ तेव्हा मी पटकन बोलून गेलो, ‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.’
> मुखडे सहज सुचले. त्यांची गाणी बनली आणि त्यांनी लोकप्रियतेचे उच्चांक गाठले, असे आनंदजी म्हणाले.

गाण्यात बप्पींना घुसडले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांना एस. डी. बर्मन स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यापूर्वी ते बोलताना ते म्हणाले, आम्ही मूळ गुजरातचे व्यापारी. स्वच्छ भाषेत सांगायचे तर बनिये.

मुंबईतील गिरगावात मराठमोळ्या वातावरणात राहिलो. अभ्यासात फार रमलो नाही; पण कॉलेजमध्ये तेव्हाच्या गीता दत्त, हेमंतकुमार, मन्नादा, तलत मेहमूद यांना घेऊन अनेक कार्यक्रम केले. आम्ही भाऊ असल्याने ‘इगो’चा प्रश्न उद्भवला नाही. लतादीदींची सर्वाधिक सोलो गाणी आम्ही केली याचा अभिमान वाटतो. त्या अद्वितीय गायिका आहेत, असे गौरवोद‌्गारही आनंदजी यांनी काढले.