आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Againest Pcmc Commissoner Srikar Pardeshi Transfer

श्रीकर परदेशी यांच्या बदलीविरोधात तिस-या दिवशीही आंदोलन सुरुच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्याविरोधात आज तिस-या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. परदेशी यांची बदली रद्द करा अशी मागणी करीत पिंपरी महापालिकेतील भाजप-सेना-आरपीआय हायुतीने महापालिकेच्या मुख्यालयात घुसून निदर्शने केली. यावेळी महायुतीच्या नगरसेवकांसह 25 पेक्षा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
आयुक्त परदेशी यांच्या बदलीचा आदेश शुक्रवारी सायंकाळी पिंपरीत येऊन धडकला. त्यानंतर शनिवार, रविवार व आज सोमवारी सलग तिस-या दिवशी आंदोलन सुरुच आहेत. सत्ताधारी सोडले तर समाजातील सर्वच घटकांनी परदेशींच्या बदलीला विरोध दर्शिवला आहे. तसेच त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही परदेशींची बदली रद्द करण्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच प्रामाणिक अधिका-यांची बदली करणा-यांना निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याचबरोबर परेदशी यांची केवळ 18 महिन्यात का बदली करण्यात आली याबाबत अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते व सामान्य लोक शेकडोंनी अर्ज करणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे.
या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष व संघटनांकडून आंदोलन, निदर्शने सुरु आहेत. सामान्य लोकही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींची बदली केली असल्याचा आरोप करीत त्यांचा निषेध केला.
पुढे पाहा छायाचित्रे, तरूणांनी शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी रॅली काढून परदेशींच्या बदलीचा निषेध केला...