आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न; गिरीश बापट यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले असून तो प्रदर्शित झाल्यास वाद होऊ शकतो. त्यामुळे पुणे अाणि पिंपरी-चिंचवड भागात हा चित्रपट प्रदर्शित करू नका, अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे पाेलिस अायुक्त व दाेन्ही महापालिकांच्या अायुक्तांना दिल्या अाहेत.   दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील राजपूत समाजाच्या नागरिकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत साेमवारी पिंपरी महापालिकेवर माेर्चा काढला. चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच अांदाेलकांची मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक घेण्यात येईल, असे अाश्वासन पालकमंत्र्यांनी अांदाेलनकर्त्यांना दिले अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत देशभरात पद्मावती चित्रपटाला मोठ्या प्रमाणात राजपूत आणि हिंदू संघटनांचा विरोध होत  आहे. काही संघटनांनी तर दीपिका पदुकोणचे नाक कापून आणणाऱ्याला काही लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...