पुणे- देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच बारामती नगरपरिषदेसमोर गरीब व गरजु शालेय विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य, बुट व गणवेश मिळण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन केले.
शालेय साहित्य व गणवेश खरेदीच्या फक्त निविदा निघाल्या. मात्र गेल्या 2 वर्षांपासुन शालेय साहित्य व गणवेश वाटप झालेच नाही. बारामती नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी नगर परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करत "यह आझादी झुठी है, देश की जनता भुखी है" अशा घोषणा दिल्या. दरम्यान मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू असताना मुख्याधिकारी मंगेश चितळे, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे व शिक्षण मंडळ अध्यक्ष पवार दाखल झाले. त्यांनी येत्या 10 दिवसात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो