आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Ghorpade Todoy Joins In Bjp In The Presence Of Nitin Gadkari

अजित घोरपडे आज भाजपात, गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अजित घोरपडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत घोरपडे कवठेमहांकळ येथे हा पक्षप्रवेश होईल.
घोरपडे हे युती शासनाच्या काळात कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेसचे सहसदस्यत्व स्वीकारून ते पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्री झाले. 2009 च्या फेररचनेत त्यांचा कवठेमहांकाळ मतदारसंघ संपुष्टात आला आणि तो गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघात विलीन झाला. त्यामुळे राजकीय कारकिर्द धोक्यात आल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गृहमंत्री पाटील यांच्यासमोर तासगावात घोरपडेंचे आव्हान असेल.
राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याने भाजपात प्रवेश करत आहे. आर. आर. पाटील यांनी आमच्यावर अन्याय केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना कडाडून विरोध करू, असे घोरपडे यांनी म्हटले आहे.
घोरपडेंची राजकीय कारकिर्द
- 1990 मध्ये कवठेमहांकळ येथून काँग्रेसचे नेते शिवाजीराव शेंडगे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून विधानसभेला लढले व पराभूत झाले.
- 1995 ला अपक्ष म्हणून प्रथमच विधानसभेत पोहचले. युती सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले.
- 1999 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून विधानसभेत, काँग्रेसचे सहसदस्य होत राज्यमंत्रिपद मिळविले.
- 2004 साली जयसिंग शेंडगे यांचा पराभव करीत सलग तिस-यांदा विधानसभेत पोहचले.
- 2009 साली काँग्रेसचे उमेदवार प्रतिक पाटील यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून लोकसभा लढवली व केवळ 39 हजारांनी पराभव झाला.