आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू न पाजल्याने पुण्यात सख्ख्या भावाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दारू पाजली नाही म्हणून दोन साथीदारांच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना पिंपरी येथील कुदळे काॅलनीत शुक्रवारी उघडकीस आली. अजित दत्तात्रय केळकर (24) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अमित दत्तात्रय केळकर, अमित राजेश सिंग आणि रोहित मधुकर दौंडे यांना अटक केली आहे. दारू पिण्यावरून अजित व अमित यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या अमितने दोन साथीदारांच्या मदतीने अजितला बेदम मारहाण करत पट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला.