आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Advise To Bjp & Sena, All Party To Fight Separtely In Asselmbly Election

सर्वांनीच स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अजित पवारांचा सेना-भाजपला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंकुश काकडे, संग्राम जगताप, पांडुरंग अभंग उपस्थित होते.)
अहमदनगर- आगामी विधानसभा निवडणुका राज्यातील सर्वच पक्षांनी स्वबळावर लढाव्यात असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर येथे केले आहे. काँग्रेसने आम्हाला किमान 144 जागा दिल्या तरच आम्ही एकत्र निवडणूक लढवू अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा मेळाव्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवून स्वबळ अजमावावे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूका लढविल्यास कोणाची खरी किती ताकद आहे ते कळून येईल. मात्र आपले हे व्यक्तिगत मत आहे असे सांगण्यासही अजित पवार विसरले नाहीत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवावी असे आम्हालाही वाटते. मात्र किमान 144 जागा आमच्या मिक्षपक्षाने आम्हाला दिल्या तरच आम्ही एकत्र निवडणूक लढू अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत असेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात एकदा सर्वच पक्षांनी 288 जागा लढवाव्यात त्यामुळे जनता कोणाला निवडते व कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे कळून येईल. पवार यांनी असे वक्तव्य करून भाजप व शिवसेनेने स्वतंत्र निवडणूका लढवाव्यात असा अप्रत्यपक्ष सल्ला दिला आहे. तुम्ही स्वबळावर लढणार असाल तर आम्ही 100 टक्के स्वबळावर लढू असेच संकेत अजित पवारांना आजच्या वक्तव्यातून द्यायचा आहे.