आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर कार्यकर्त्यांची बिनपाण्याने! अजित पवारांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांना फटकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - कृषिमंत्री शरद पवारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बारामतीत केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी का रोखली नाही? आमच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या कार्यकर्त्यांना टीका करणार्‍यांच्या मांडी लावून बसताना लाज कशी वाटत नाही? हा प्रकार आपल्याला अजिबात आवडलेला नाही. ते कार्यकर्ते समोर आले तर त्यांची बिनपाण्याने अशी चंपी करीन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका करताना गप्प राहणार्‍या स्वपक्षीय कार्यकर्त्यांना काकांसमोरच जाहीर फटकारले.

अजितदादांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांना साहेबासमोरच फटकारल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या भाषणात त्यावर फुंकर मारली. बारामतीकरांनी आपल्यावर खूप प्रेम केले आहे. ते सहनशील आहेत. त्यांना दोष देणे म्हणजे अन्याय आहे. बारामतीकरांनी मला 46 वर्षे साथ दिली. 70 ते 80 टक्के मतदान करतात. त्यांना दोष देणं योग्य नाही. बारामतीकर सहनशील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेल्या टीकेकडे मी दुर्लक्ष केलं आहे, असे सांगत दादांनी दमबाजी केलेल्या कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती व्यक्त केली.