आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांचा आलिशान बंगला धोक्यात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला श्रीनिवास पवार यांच्या नावावर असलेला एक आलिशान बंगला सध्या अडचणीत सापडला आहे. पुणे जिल्ह्यातील रिहे धरणाच्या (ता. मुळशी) निसर्गरम्य परिसरात 31 गुंठे क्षेत्रावर उभारण्यात आलेला हा बंगला वतनाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधल्याचे स्पष्ट होत आहे.
रवींद्र ब-हाटे यांनी माहिती अधिकारात पाटबंधारे खात्याकडे पवार यांच्या बंगल्याबद्दलची माहिती मागितली होती. त्यावर पाटबंधारे खात्याने या जमिनीची मालकी नाकारणारा खुलासा दिला आहे. बºहाटे म्हणाले, ‘सर्व्हे क्रमांक 555, हिस्सा क्रमांक 4 या मिळकतीसंदर्भात शर्मिला पवार यांनी जिल्हाधिका-यांचा बनावट विक्री आदेश वापरून स्वत:च्या नावे बेकायदेशीर खरेदीखत लिहून घेतल्याचे सिद्ध झाले. या अनुषंगाने पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.’’ सर्व्हे क्रमांक 555 मधील पवारांचा बंगला पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर नसल्याचे पाटंबधारे खाते आता सांगत असल्याने जमिनीची मालकी मूळ महार वतनदार बबन गजरमल यांच्याकडे जाते. हा सात-बारा उतारा दुरुस्त करण्याच्या सूचना उपविभागीय पातळीवर देण्यात आल्या असल्याचे ब-हाटे म्हणाले.
जमीन खरेदी रीतसरच - जमीन गजरमल यांची की पाटबंधारे खात्याची याची खातरजमा करण्यासाठी मीच मोजणी करून घेतली तेव्हा ती गजरमल यांची असल्याचे आढळले. गजरमल यांच्याकडून मी जमीन खरेदी केली. पैसे दिल्याची पावती माझ्याकडे आहे. मी काही गैर केलेले नाही.’’ - श्रीनिवास पवार
* पुणे जिल्ह्यात (ता. मुळशी) निसर्गरम्य परिसरात 31 गुंठे क्षेत्रावर बंगला.
* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनींच्या नावे बंगल्याची मालकी.