आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Critics On Girish Bapat & Bjp Leaders

सचिन अग्रवाल न सापडायला तो काय अंडरवर्ल्ड डॉन आहे का? अजित पवारांचा भाजपला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता पुणे नगर रस्त्यावरील बीआरटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. - Divya Marathi
अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता पुणे नगर रस्त्यावरील बीआरटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
पुणे- मेपल ग्रुपचा बिल्डर सचिन अग्रवाल हा अजून पोलिसांच्या हाती न लागायला काय तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे का? पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोरून पळून जातोच कसा? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. सचिन अग्रवाल आणि भाजपच्या नेत्यांचे आर्थिक लागेबांधे असल्यानेच तो मोकाट आहे व त्यामुळेच त्याला अटक झाली नाही असेही अजित पवारांनी सांगितले.
अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता पुणे नगर रस्त्यावरील बीआरटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. नगर रोडवरील चंदननगरमधील जुनी भाजी मंडई परिसरातील पर्णकुटी पोलिस ठाण्याजवळ आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. त्याआधी अजित पवार यांनी खडकवासला धरणामागील जॅकवेल पंपहाऊस व खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 2500 मि मि व्यासाची पोलादी दाबनलिका टाकण्याचे कामाचे उद्घाटन केले. तसेच पर्वती जेलकेंद्र ते लष्कर जलकेंद्र दरम्यानही 2200 मि मि व्यासाची पोलादी दाबनलिका टाकण्याचे भूमीपूजन अजितदादांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व विकासकामांच्या उद्घाटनानंतर अजित पवार चंदननगर येथील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, सचिन अग्रवाल याने 5 लाखांत घर देऊ असे सांगून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. पुण्यासारख्या शहरात 5 लाखांत घर मिळूच शकत नाही. असे असतानाही त्याबाबत जाहिराती देऊन लोकांची फसवणूक करण्यात आली. या जाहिरातीत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री गिरीश बापट यांचेही फोटो लावले गेले. हे फोटो बापटांना विचारल्याशिवाय लावले जाऊच शकत नाहीत. सचिन अग्रवाल आणि भाजप नेत्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळेच गिरीश बापट सचिन अग्रवालला पाठीशी घालत आहेत. नाहीतर पालकमंत्री गिरीश बापटांच्या समोरून पळून जायला सचिन अग्रवाल काय दाऊद इब्राहिम आहे काय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
पुढे वाचा, सचिन अग्रवालच्या अटकपू्र्व जामीन अर्ज फेटाळला...