आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Loss Malegaon Sahakari Sakhar Karkhana Election

बारामतीच्या कारखान्यात पवारांना धक्का, बारा वर्षांची सत्ता संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसची कारखान्यावरील बारा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.
अजित पवारांची एकाधिकारशाही, ऊस दरवाढीच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे जुने सहकारी चंदरराव तावरे यांनी पवारविरोधकांची मोट बांधून पवारांचे पानिपत केले. पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच एवढा दारुण पराभव पाहण्याची वेळ पवारांवर आली आहे.
या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनलला २१ पैकी केवळ ६ जागा मिळाल्या. तर सहकार बचाव शेतकरी पॅनलने तब्बल १४ जागा जिंकून पवारांच्या एकाधिकारशाहीला शह देण्यात यश मिळवले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
महिनाभरापासून ते तयारीला लागले होते परंतु शेतकरी सभासदांनी त्यांना हात दाखवल्यामुळे आता दक्षिण पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखाना व इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचा कस लागणार आहे. हा खासगीकरण विरुद्ध सहकार आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया तावरे यांनी विजयानंतर व्यक्त केली.