आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या पूर्वसंध्येला पवारांची ‘दादा’गिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रचारादरम्यान पाण्याविषयी प्रश्न उपस्थित करणार्‍या युवकाला थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बारामती तालुक्यात दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सर्वच गावकर्‍यांनी ‘आम्हा सर्वांनाच तुरुंगात टाका’ असे आक्रमक प्रत्त्युत्तर दिल्यानंतर मात्र पवारांनी गावातून काढता पाय घेतला.

बारामती तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. बुधवारी अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह मासाळवाडी (ता. बारामती) गावात गेले होते. तिथेही पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दादांनी ‘दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा’ असे आवाहन केले. त्या वेळी नीलेश मासाळ या तरुणाने ‘2006 मध्येही तुम्ही असेच आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर अजितदादांनी ‘टाका रे याला जेलमध्ये’ असे फर्मान त्यांनी सोडले. या प्रकारामुळे गावकरीही संतप्त झाले. त्यांनी ‘आम्हालाही तुरुंगात टाका’ असे आव्हान दादांना दिले. मतदानाच्या पूर्वसंध्येला गडबड नको, असा सावध पवित्रा घेत दादांनी मग कार्यकर्त्यांसह गावातून काढता पाय घेतला.