आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान माेदींच्या अावडत्या निर्णयामुळे जनतेचे मात्र हाल - अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाईस अामचा नेहमीच पाठिंबा अाहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदींनी केवळ अापल्याला अावडला म्हणून काेणताही निर्णय अचानक जाहीर करू नये. त्यामुळे जनतेचे हाल हाेतात. सुट्या पैशांअभावी अाज टपरीवर चहाही मिळेनासा झालाय. परिणामाचा दूरगामी परिणाम न अभ्यासता माेदींनी नाेटाबंदीचा निर्णय घेतलाय,’ अशी टीका राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.

‘माेदींच्या नाेटाबंदी निर्णयामुळे देशातील साठ लोकांना प्राण गमवावा लागला. याला जबाबदार कोण? जिल्हा सहकारी बंॅकांवर सरकारचा काय राग आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या सहकारी बंॅकांना इतर बंॅकांच्या कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. यावर मार्ग काढण्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अाश्वासन दिले असले तरी अजूनही त्यावर सरकारला मार्ग सापडत नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाला खर्चाच्या तिप्पट भाव देण्याची घाेषणा करणारे सरकार या अाश्वासनाची पूर्तता करण्यातही अपयशी ठरले अाहे,’ अशी टीकाही त्यांनी बारामतीतील एका खासगी सत्काराच्या कार्यक्रमात केली.

नोटाबंदीमुळे गावातील एकाचे लग्न वर्गणी करून करावे लागले, अशी माहिती एका कार्यकर्त्याने दिली. त्यावर ‘थोडं सहन करायला शिका...लग्न एक वर्ष पुढं ढकलले असते तर नवरा- नवरीला काही फरक पडला नसता,’ असा टाेलाही पवारांनी लगावला त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

‘बारामती मुक्काम’ ही फडणवीसांची बडबड
‘स्थानिक संस्था ताब्यात दिल्यास बारामतीत मुक्कामास येईल’ अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती. त्याची खिल्ली उडवत अजित पवार म्हणले की, ‘कितीतरी मुख्यमंत्री बारामतीत मुक्कामाला आले. खुद्द शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते... त्यांनी कितीतरी मुक्काम बारामतीत केलेत... त्यामुळे मुख्यमंत्री बारामतीत झोपलाच नाही असं नाही. संस्था ताब्यात आल्यावर झोपायला येणार आहेत का ते? असे सांगण्यापेक्षा फडणवीसांनी चांगला विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला असता तर अापणही त्यांना प्राेत्साहनच दिले असते. कोणी उठून काही बडबड करतंय,’ अशी टीका त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...