बारामती - मोदी सरकारने जनतेला अच्छे दनि आनेवाले है अशी स्वप्ने दाखवली. मात्र, प्रत्यक्षात महागाई, पेट्रोल दरवाढ, खतांच्या किमतीत वाढ, एवढेच नाही तर सिमेंटच्या किमतीत प्रचंड वाढ केली. मग शेतकयांच्या शेतीमालाच्या आधारभूत किमतीत का वाढ केली नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे का? सर्वसामान्य जनतेचे चांगले दिवस येण्याऐवजी नुकसानच झाले. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. तसेच मोदींच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या होत असलेल्या अपमान योग्य नाही. प्रत्येकाचा मानसन्मान ठेवला पािहजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान टेंडर न काढता भूमिपूजन करत आहेत
नागपूरच्या मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारने २० टक्के, केंद्र सरकारकडून २० टक्के, नागपूर महापालिकेची १० टक्के, तर ५० टक्के कर्ज आहे. आता पुणे मेट्रोच्या कामाच्या निविदा निघणार आहेत.
आपण कधी निविदा न काढता भूमिपूजन करत नाही. आता पंतप्रधान निविदा न काढता भूमिपूजन करत आहेत, असा पंतप्रधानांचा कारभार आहे, असा टोलाही अजित पवारांनी या वेळी लगावला.