आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally, BMC Moves Towards Mandatory Structural Audits

सर्व मनपा क्षेत्रात इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, मुख्य सचिवांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर सर्व प्रमुख शहरांतील महानगरपालिकांना आपापल्या हद्दीत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.अनधिकृत इमारती बांधणार्‍याविरुद्ध कारवाई करून धोकादायक इमारती रिक्त करण्याचे आदेश मुख्य सचिव जे. के. बांठिया यांनी शनिवारी दिले . तसेच सर्व महापालिका आयुक्तांशी वैयक्तिक चर्चा करत असून तेथील सद्य:स्थितीचा आढाव घेत असल्याचे बांठिया यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.
मुंब्रा येथे घडलेली घटना भीषण होती. सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या हद्दीत स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असा आदेश बजावण्यात आला आहे. या ऑडिटमुळे अनधिकृत, मोडकळीस आलेल्या, पुनर्बांधणीसाठी आलेल्या इमारतींची संख्याही मोठी आहे. पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून राज्य सरकारने तातडीने पावले उचलावित. त्यामुळे पुढील कारवाई करणे महापालिकांना सोपे जाऊ शकेल, असा विश्वास बांठिया यांनी व्यक्त केला. अनधिकृत बांधकामे निश्चित केल्यावर लगेच कारवाई करण्याची गरज असून तशा कडक सूचनाच दिल्या आहेत.कोणत्याही कारणामुळे या बांधकामांना संरक्षण दिले जाणार नाही.

क्लस्टर डेव्हलपेंटचा प्रस्ताव
महापालिका आयुक्तांबरोबरच पोलिस आयुक्तांनाही अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या सूचना दिल्याचे बांठिया म्हणाले. एकट्या ठाणे परिसरामध्ये 1,049 इमारती धोकदायक असून 57 इमारती अतिधोकादायक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये सांगितले होते. या इमारतींमध्ये 88 हजार लोक राहत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आतापर्यंत मुंबई शहरासाठी असलेला क्लस्टर डेव्हलपमेंटचा नियम उपनगरांसाठीही लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.