आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांची जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत उडवली दुष्काळग्रस्तांची टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा ‘टगेगिरी’ दाखवून दिली. इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी खालच्या पातळीवर उतरत दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली. ‘तो एक कोण देशमुख 55 दिवस झालं आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय.. पाणी सोडलं? पाणी नाही काय सोडता.. मुतता का तिथं आता?... अवघडंय बाबा...पाणी प्यायला मिळंना, तर लघवी पण होईना,’ अशा अर्वाच्य भाषेत अजितदादांनी दुष्काळग्रस्तांची टर उडवली.
बारामतीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या निंबोडी येथे विविध विकासकामांचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी झालेल्या सभेस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर येथील कार्यकर्ते दशरथ माने, प्रदीप गारटकर यांच्यासह हजार ते दीड हजार लोक उपस्थित होते. यात 40 ते 50 महिलादेखील होत्या. याचेही भान उपमुख्यमंत्र्यांनी राखले नाही. एवढेच नाही तर अजितदादांच्या शिवराळ बोलण्याला उपस्थितांतून हसून दाद मिळत होती. दरम्यान, सभेनंतर काही पत्रकारांनी पवार यांना गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते लगेच निघून गेले. नंतरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

आकाशी कुर्ता आणि गॉगल
० सकाळी साडेअकराच्या सुमारास पवार यांचा ताफा धुरळा उडवत निंबोडी गावात दाखल झाला. पांढर्‍या लायनिंगचा आकाशी कुर्ता घातलेल्या आणि डोळ्यांवर गॉगल चढवलेल्या अजितदादांनी भूमिपूजन होताच भाषणाला सुरुवात केली.
० दुष्काळासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर पवार बोलतील या आशेने बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकरी त्यांचे भाषण ऐकत होते, परंतु त्यांनी वेगळाच सूर लावला.

सोलापूरच्या देशमुखांचा संदर्भ
उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सोलापूरला पाणी देण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील प्रभाकर देशमुख 55 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणी देण्याचे आश्वासन देशमुख यांना दिले होते. राष्ट्रवादीच्या ताब्यातील बारामती नगर परिषदेला उजनीचे पाणी शहरातील उद्योगांना हवे आहे. त्याआधारे अजित पवार बोलले.

बेताल बोल...
सहकार सहकार करूनच आम्हाला बांबू लागलाय.. सहकाराने वाट लावली.
तुम्ही म्हणाल, आज अजित पवार
दिवसाच टाकून आलाय की काय!