आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे वागणे दोन तोंडी गांडुळासारखे, लोक दुधखुळी नाहीत; अजित पवारांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेनेचे वागणे दोन तोंडी गांडुळासारखे झाले आहे, या शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 
 
बारामती येथे दिवाळीनिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेला लोकांची सहानुभूती हवी आहे आणि सरकारची उबही हवीय. जनतेत काम करायचेय, तर सरकार सोडून बाहेर या. मात्र ते त्यांना जमत नाही. शिवसेनेचा डबल गेम चाललेला आहे. लोक काय इतकी दुधखुळी नाहीत. तुम्ही सरकारमध्ये आहात, तर तुम्हाला आंदोलनाची काय गरज आहे? सरकारमध्ये असलेल्या लोकांनी धोरणं ठरवायची आणि राबवायची असतात. आंदोलने करायची नसतात. आंदोलनं ही जनता करत असते. जनता एखाद्या विषयाला त्रासली, एखादा विषय जनतेच्या विरोधात गेला किंवा विरोधी पक्षाचे जे आमदार असतात, कार्यकर्ते असतात किंवा सामाजिक संस्थेमध्ये काम करत असणारी लोक असतात, ते आंदोलन करत असतात. शिवसेनेला नक्की कळतच नाही की, नक्की आपण काय करावे?, असे अजित पवार म्हणाले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...