आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी निकालाचे स्वागतच, नराधमांना आता लवकरात लवकर फाशी द्या- अजित पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोपर्डी प्रकरणातील नराधमांना दिलेल्या फाशीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो. आता या नराधमांना लवकराच लवकर फाशी दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. 

 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून प्रकरणी तिन्ही नराधमांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, हल्ली रा. पुणे, मूळ रा. कोपर्डी), अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. निकालानंतर पीडितेचे आई-वडील व कोपर्डीच्या ग्रामस्थांनी पीडितेला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. निकालाच्या वेळी आरोपींचे वकील अनुपस्थित होते. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात प्रचंड गर्दी झाली होती. निकालानंतर न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाली.

बातम्या आणखी आहेत...