आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पवारांची तिसरी पिढी राजकारणात, अजित पवारांचा मुलगा पार्थ प्रचारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणी घराण्यातील अनेक पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. आता महाराष्ट्रासह देशाचे राजकारण हालवून सोडणा-या शरद पवारांच्या घराण्याची तिसरी पिढी राजकारणात येत असल्याचे चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शरद पवार यांचे पुतणे अशी ओळख असलेल्या अजित पवारांचा मुलगा पार्थ यानेही आता राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ याने तुळजापुरात भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये पार्थसोबत माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार सहभागी झाले होते. पद्मसिंह पाटील हे पार्थचे सख्खे मामा आहेत.
तुळजापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरूवात झाली. पदयात्रेदरम्यान पार्थ आणि मल्हार यांनी मतदारांशी संवाद साधला.
पुढे पाहा, अजित पवारांचा मुलगा पार्थचे फोटो...