आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Statement Govt Taken Action Agianest Him For Bank Iregulatries

राज्य बॅंक आरोपाप्रकरणी बाजू मांडण्याची संधी दिली नाही- अजित पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य सहकारी बॅंकप्रकरणी राज्य सरकारने पूर्वग्रहदूषित विचारातून कारवाई केली आहे असे माझे मत आहे. राज्य सरकारने उचललेले पाऊल कठोर असले तरी स्वागतार्ह आहे. मात्र, सरसकट कारवाई करण्याची पद्धत चुकीची आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्यावर केली कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या सर्व प्रकरणात प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही ती द्यायला हवी होती असेही अजितदादांनी सांगितले.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवड काही कार्यक्रमानिमित्त होते. रविवारी मोहननगर येथे महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे. त्याची माहिती व आढावा घेण्यासाठी ते शहरात होते. यावेळी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी यावर भाष्य केले.
पवार म्हणाले, राज्य सरकार कायद्यातील चौकटीच्या बाहेर जाऊन कारवाई करीत आहे. यात सर्वानाच समान न्याय लावला आहे. सहकारात काही गडबडी झाल्या आहेत. मात्र याला सर्वसकट लोकांना कसे जबाबदार धरता येईल. जे दोषी आहेत त्यांच्यावरच कारवाई करा असे सांगत अजित पवारांनी आपण कोणत्याही गैरव्यवहाराला जबाबदार नाही असे सांगितले.
सहकारात पारदर्शकता आली पाहिजे हे मान्य करून पवार पुढे म्हणाले की, सरकारने उचललेले पाऊल कठोर वाटले तरी योग्य आहे. मात्र, सरसकट सर्वांना दोषी ठरवणे योग्य नाही. संबंधित निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले ही दुसरी बाजूही सरकारने समजून घेतली पाहिजे. तसेच ज्यांच्यावर कारवाई करता त्यांना आपली बाजू मांडू द्यायला पाहिजे, जी दिली गेली नाही असे मत अजित पवारांनी मांडले.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे अस्तित्त्व शून्य-
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. राज्यातील सर्वाधिक सुंदर काम येथील महापालिकेत झाले आहे. याचा गौरव म्हणून आम्हाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. जी कामे केली आहेत ती चोरून ठेवलेली नाहीत. सर्व जगाला दिसत आहेत. त्यामुळे लोक आमच्यासोबत राहतील. मात्र, विरोधक केवळ आपले अस्तित्त्व टिकविण्यासाठी बेछूट आरोप करीत आहेत. येथे कामे झाल्यामुळे त्यांना खोटे आरोप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तो त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे असे सांगत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे अस्तित्त्व शून्य आहे असा टोला हाणला.
भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत केवळ 3 नगरसेवक आहेत. दुसरीकडे मागील दोन वर्षात येथील राजकीय स्थिती बदलून गेली आहे. एकेकाळी सर्व आमदार राष्ट्रवादीचे असणा-या या शहरात आता पक्षाचा एकही आमदार नाही. भाजप-शिवसेनेचा प्रत्येकी आमदार विरोधकांकडे आहे. शिवसेनेचे दोन खासदार व राज्यसभेत भाजपचा खासदार असल्याने भाजप-शिवसेनेच्या आमदार-खासदारांची संख्या मोठी आहे तर राष्ट्रवादीची झोळी रिकामी झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आगामी काळात सत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केले आहे.