आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा \'तो निर्णय\' फडणवीस सरकारचा शेवटचा दिवस असेल- अजित पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. आताच्या सेनेकडे स्वाभिमान नाही. जर सेनेने स्वाभिमान दाखवून सत्तेतून बाहेर पडून दाखवले तर मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारीच वर्तविले होते. आता त्यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही शरद पवारांच्या विधानाची री ओढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'तसा' निर्णय घेतला तर तो फडणवीस सरकारचा शेवटचा दिवस असेल असे विधान करून अजित पवारांनी काकांच्या सुरात सूर मिळवला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मोदींसह राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले, पुण्यासारख्या शांत शहरातही दंगलीचे प्रकार घडवले जाताहेत हे राज्य सरकारचे अपयश आहे. ह्या सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणेही ठळकपणे समोर येताहेत.
शरद पवारांनी शुक्रवारी शिवसेनेवर टीका केली होती. त्याबद्दल अजित पवारांना छेडले असता ते म्हणाले, पवारसाहेबांच्या विधानात काहीही चुकीचे नाही. ते जे म्हणाले ते खरं आहे. कारण या सरकारकडे पूर्ण बहुमत नाही. सेनेने पाठिंबा काढल्यास हे सरकार टिकूच शकत नाही. शिवसेनेच्या नेत्यांची विधाने असो किंवा ‘सामना’मधून झालेली टीका असो हे आता रोजचेच प्रकार घडत आहेत. त्यामुळे भाजप सरकारवर शिवसेना समाधानी दिसत नाही. शिवसेनाच काय तुम्ही भाजपच्या वेगवेगळ्या मंत्र्यांची वक्तव्ये तपासा. एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्याबाबत जी वक्तव्ये केली आहेत त्यामुळे तेथे काय सुरु आहे हे लक्षात येतच आहे. भाजप सेनेलाही डावलत आहे. अमित शहा काय म्हणाले ते सर्वांनाच माहित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान दाखवून वेगळा निर्णय घेतला तर तो या सरकारचा वेगळा दिवस असेल असे भाकित पवारांनी वर्तवले.
पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार-
येत्या पावसाळी अधिवेशनातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहात सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नावर वर इतर अनेक समस्यांवर जाब विचारणार आहे. काँग्रेसची आणि आमची भूमिका खूप वेगळी आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलने केली ही त्यांची भूमिका आहे. पहिले 6 महिने आम्ही या नवीन सरकारला सावरायला वेळ दिला. लवकरच आमची यासंदर्भात भूमिका ठरणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली. आम्ही शांत राहिल्याने आम्ही अजूनही सत्तेतच आहोत असे वाटू लागले आहे तर भाजपमधील नेत्यांची वक्तव्ये पाहता 15 वर्षापासून विरोध बसण्याची सवय असल्याने ते अजूनही विरोध असल्यासारखेच वाटते असे अजित पवारांनी सांगताच हशा पिकला.