आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Tenders Apology Over His Statement In Baramati

‘टगेगिरी’ अंगलट येताच अजित पवारांकडून माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई- इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील सभेत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत दुष्काळग्रस्तांची थट्टा केली. पातळी सोडून अजितदादांनी केलेल्या या ‘टगेगिरी’वर रविवारी दिवसभर टीकेची प्रचंड झोड उठली. माफी मागण्यासोबतच पवार यांची पदावरून हकालपट्टी करण्याचीही मागणी झाली. प्रकरण अंगलट आल्याचे दिसताच अजित पवार यांनी अखेर सायंकाळी प्रसिद्धिपत्रक काढून राज्यातील जनतेची माफी मागितली.

विरोधकांसह बहुतेक पक्षांकडून टीका होत असतानाच राष्ट्रवादीकडून मात्र याबाबत अधिकृतपणे खुलासा किंवा प्रतिक्रिया देण्यास रविवारी कोणीही पुढे आले नाही. नवाब मलिक यांच्यापासून अंकुश काकडे यांच्यापर्यंत पक्षाचे सर्व प्रवक्ते माध्यमांपासून पळ काढत होते. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नसल्याचे सर्वांनी खासगीत सांगितले. विरोधकांनी मात्र वक्तव्याचा समाचार घेत पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे हा विषय फार ताणला गेल्यास पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची जाणीव होताच पवार यांनी माफी मागितली. दरम्यान, पक्षाचे प्रमुख केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अजित पवारांची कानउघाडणी केल्याचे समजते.

काय म्‍हणाले होते अजित पवार बारामती येथील सभेत, जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...