आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Warnig To His Party Worker At Pimpri Chinchwad

...तर तुमचाही गावित करीन, पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांना अजित पवारांचा दम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून आघाडीचा अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्याचेच काम करायचे आहे. यावरून कोणीही संभ्रम ठेवायची कारण आहे. आपण गेली काही दिवस हेच सांगत आहोत. आता शेवटचे सांगत आहे यापुढे सांगणार नाही थेट कारवाई करणार. मला पदे देता येतात तशी काढूनही घेता येतात. काँग्रेसप्रमाणे मला येथे कोणाला विचारावे लागत नाही लगेचच थेट कारवाई करू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये पक्षाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचाच प्रचार करा, अन्यथा तुमचाही विजयकुमार गावित करू असा इशारा व दम पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांसह नेत्यांना दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने लक्ष्मण जगताप यांचे नाव पुढे केले होते. मात्र, अचानकपणे त्यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली व अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लक्ष्मण जगतापांच्या भूमिकेमागे अजित पवारांचाच तर हात नाही ना अशी शंका शहरातील राष्ट्रवादीत पसरली आहे. मात्र, अजित पवारांसह वेगवेगळ्या नेत्यांनी याबाबत वारंवार खुलासा करूनही संभ्रम दूर झालेला नाही. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक, नेते दोन्हीकडे फिरत आहेत. याचाच अर्थ शेवटी ते जगताप यांना मतदान करतील व आपल्या समर्थकांनाही तसेच करायला सांगतील. याबाबत शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडे पक्षाच्या काही पदाधिका-यांनी (राष्ट्रवादीतील जगतापविरोधी गटाने) यांच्यामार्फत अजित पवारांकडे तक्रारी केल्या आहेत. यावर खुलासा करताना बहल यांनी नार्वेकर यांनी एक छुपी टीम नेमली असल्याचे सांगत कोण कोणाचे काम करत आहे व दिवसा कोण कोठे असते व रात्री कोण कोठे असते याची माहिती या टीमकडून घेतली जात आहे असे सांगत जगतापांचा छुपा प्रचार करणा-यांना धक्का दिला. याचीच दखल घेत अजित पवारांनी गुरुवारी चिंचवड व आकुर्डीत बैठका घेऊन कार्यकर्त्यांची चंपी करीत दम भरला.
अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर हे डमी उमेदवार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. यावरून कोणीही संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. पुणे हे माझे घर आहे. जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. पक्षासह मला खाली बघण्याची वेळ आणू देऊ नका. माझ्यावर कटू निर्णय घेण्याची वेळ आणू नका. मी पदे देतो तशी काढूनही घेऊ शकतो. विजयकुमार गावितांनी जातीयवादी पक्षाशी संधान साधल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली. पक्ष थोडे सबुरीने घ्या असे म्हणत असतानाही मी कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे वेगळा विचार केल्यावर मंत्र्यावरसु्दधा कारवाई केली आहे. यात पक्षाचे फायदा, नुकसान न फायदा निर्णय घेतला. त्यामुळे तुमची पदे, नगरसेवकपद काढून घेण्यास वेळ लागणार नाही व तुमचाही गावित करू, असे उपमहापौर राजू मिसाळ यांचे नाव घेत अजित पवारांनी उपस्थित पदाधिक-यांना चांगलाच दम भरला. त्यामुळे उपस्थित पदाधिका-यांची व विशेषत जगतापांचे काम करणा-यांची चांगलीच बोबडी वळाली. आता अजित पवारांच्या दमबाजीचा परिणाम किती होतो हे लवकरच समजू शकेल.