आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Won The District Coopertaive Bank Election

जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व, विरोधकांचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. भाजपने ऐनवेळी या निवडणुकीत उडी घेतली तरी त्यांची डाळ शिजली नाही. भाजपचा दारूण पराभव झाल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या पॅनेलकडून लढलेले माऊली दाभाडे यांना अजित पवारांचे निकटवर्तीय बाळासाहेब नेवाळे यांनी धूळ चारली. अपक्ष नेवाळे यांना 29 तर दाभाडेंना 27 मते मिळाली. अखेर नेवाळे दोन मतांनी विजयी ठरले.
अजित पवारांनी बारामतीतून मोठा विजय मिळवला. अजितदादांना 179 तर विरोध विलास काकडेंना केवळ 13 मते मिळाली. इंदापूरातही आमदार दत्तात्रय भरणे यांनी 79 मते सादबा तुपे यांचा 74 मतांनी पराभव करीत एकतर्फी विजय खेचून आणला. खेडमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, शिरूरमधून निवृत्ती अण्णा गवारी, मुळशीतून आत्माराम कलाटे तर जुन्नरमधून संजय काळे यांनी विजय खेचून आणला आहे. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदरमधून संजय जगताप हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.