आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलेट ट्रेन असती तर शेतकऱी परदेशातच पोहचले असते; अजित पवारांची सरकारवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लाबोल मोर्चात बोलताना अजित पवार. - Divya Marathi
हल्लाबोल मोर्चात बोलताना अजित पवार.

पुणे-. दिल्लीहून निघालेल्या शेतकऱ्यांना 160 किलोमीटर अधिकचा प्रवास करावा लागल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची अशी खिल्ली उडवली. बुलेट ट्रेन असती तर शेतकऱ्यांना परदेशात पोहचवले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

 

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना प्रतिष्ठा दिली आणि हे सरकार त्याच महिलांबद्दल गलिच्छ भाषा वापरत आहे, असा आरोप करत हे सरकार भूलभुलैय्या,थापेबाजी आणि फेकूगिरी करणारे असल्याची टीका त्यांनी केली.

 

अजित पवार म्हणाले की, बुलेट ट्रेन येण्याअगोदरच सरकारवर सव्वालाख कोटी कर्ज झाले आहे.आम्ही सर्व सांगत आहोत हे चुकीचं आहे.हे करण्याची गरज नाही. आपण तिथपर्यंत पोहचलो नाही. आपले काही शेतकरी दिल्लीला गेले होते. त्याठिकाणी मोर्चा संपला आणि शेतकरी कोल्हापूरला निघण्यासाठी रेल्वेत बसले,मात्र शेतकऱ्यांना तीन तासांनी रेल्वे उलट दिशेने १८० किलोमीटर गेली आहे असं समजले. बुलेट ट्रेन आणि जिकडे जायची आहे तिकडे न जाता उलटी जाते, मुंबई आणि पुणे एवढे अंतर गेली तरी कोणाला कळल नाही.पाहा हा असला कारभार.आणि बुलेट ट्रेन करायला निघालेत, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली,

 

पुढे ते म्हणाले ती बुलेट ट्रेन एवढ्या जोरात कुठल्या कुठं जाईल भारतातून दुसऱ्या देशात आणि तिथं उतरताना पासपोर्ट नाही आणि काहीच नाही.अस म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. असला भोंगळ कारभार आहे अरे तुम्ही आम्हाला काय बनवताय.असे ते  म्हणाले.

 

 शरद पवार यांनी आदर सन्मान,प्रतिष्ठा देण्याचं काम केले.निर्णय प्रक्रियेमध्ये आणले. त्या महिलांचा बद्दल हे सरकार गलिच्छ भाषा वापरत आहे.भाजपचे मंत्री दारूची बाटली खपत नसेल तर तिला महिलेचे नाव द्या असे वक्तव्य करत आहेत. मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आपण सरकारमध्ये आहोत आपण कसं वागावं बोलावं, निर्णय कसे घ्यावेत. कसे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय द्यावा. मात्र तशा प्रकारचा न्याय दिला जात नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे नाभिक समाजाच्या विरोधात अत्यंत चुकीचे वक्तव्य करतात. त्यांना समजत नाही आपण समाजाला दुखवतोय.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...