आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar's Panel Won In Someshwar Suger Factory Election

साेमेश्वर कारखान्याने राखली पवारांची प्रतिष्ठा, सर्व २१ संचालक विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवाने झालेली नाचक्की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पुसून काढली. पवारांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा जिंकून या कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व कायम राखले.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकालाकडे राज्यातील सहकार जगताचे लक्ष लागले होते. आघाडी सरकारच्या काळात ऊसदरांच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे रान पेटवणारे खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यांनी पवारांविरोधात प्रचार केला. मात्र या दाेन्ही नेत्यांचा कुठेही करिष्मा दिसला नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, तर सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा तसेच फलटण तालुक्यातील काही गावे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतत. त्यामुळे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पॅनलला पाठबळ मिळाले. त्यामुळे विराेधी काकडे गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले.

पवारांची दमछाक
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवार फक्त शेवटचे दोन दिवस बारामती मतदारसंघात फिरले होते. मात्र माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवाने त्यांची झाेप उडाली हाेती. अाता साेमेश्वरच्या निवडणुकीत तरी काही दगाफटका हाेऊ नये म्हणून अजित पवार गेल्या १५ दिवसांपासून या भागात सभासदांच्या भेटीगाठी घेत िफरत हाेते.

सोमेश्वराची शपथ
पवारांच्या पॅनेलमधील उमेदवार आपल्याच पॅनेलमधील इतर उमेदवारांसाठी फारसे प्रयत्न करत नव्हते. दगाफटका हाेणार असल्याचे लक्षात येताच अजित पवारांनी परिसरातील जागृत देवस्थान सोमेश्वरांच्या मंिदरात पॅनेलमधील सर्व उमेदवारांना परस्परविरोधी मतदान न करण्याची शपथ घ्यायला लावली होती.