आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेतील ११ मुलींसह ५० ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हिंजवडी भागातील नेरे येथील एका फार्म हाऊसवर शनिवारी पहाटे चालू असलेल्या एका मद्यधुंद पार्टीवर पाेलिसांनी छापा टाकून ५० महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. मात्र, यापैकी ११ महाविद्यालयीन तरुणींचा लेखी जबाब घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात अाली.
पुण्यातील विमानतळ भागात असलेल्या सिम्बायाेसिस महाविद्यालयात देशभरातील उच्चभ्रू वर्गातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी हिंजवडी येथील नेरे परिसरातील मिरर जमतानी याच्या फार्म हाऊसवर शुक्रवारी रात्री पार्टीचे अायाेजन केले हाेते. या पार्टीसाठी महाविद्यालयीन तरुण- तरुणी खासगी बसने फार्म हाऊसवर गेले हाेते. काेणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या या अाेल्या पार्टीची पाेलिसांना खबर मिळताच त्यांनी शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पार्टीवर छापा टाकला व ५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तसेच काही दारूच्या बाटल्याही जप्त केल्या.

सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नाेंदवून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता त्यांना िपंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात अाले, तर ११ मुलींचा जबाब नाेंदवून, दम देऊन त्यांना साेडून देण्यात अाले.

फार्म हाऊस मालक अटकेत
हिंजवडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस िनरीक्षक एस. पी. भाेसले यांनी सांगितले की, मिरर जमतानी हा िसम्बायाेसिस महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या मालकीच्या फार्म हाऊसवर ही पार्टी सुरू हाेती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्यास अटक करण्यात अाली अाहे. जमतानी याचे कुटुंबीय िपंपरीतील बांधकाम व्यावसायिक अाहेत.
बातम्या आणखी आहेत...