पुणे- राज्यातील फडणवीस सरकारने पुणे शहरातील मोकळ्या मैदानांची व क्रीडागणांची जागांवरील आरक्षण उठविल्याच्या विरोधात पुण्यातील सर्व माजी महापौरांनी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली मनपा भवनात आंदोलन केले.
पुण्यातील मोकळ्या जागा, शाळांची आरक्षणे, दवाखान्यांसाठी सोडलेल्या मोकळ्या जागांवरील आरक्षण उठवले आहे. याचबरोबर क्रीडागणांसाठी सोडलेल्या मोकळ्या जागांवरील आरक्षण उठविले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र भाजप सरकार आरक्षण उठविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे अखेर पुण्यातील सर्व जुने-जानते लोकांनी या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व माजी महापौरांनीही मुलांना खेळण्यासाठी मैदाने हवीत, नागरिकांना आरोग्यासाठी ठराविक अंतरात दवाखाने, हॉस्पिटल हवेत असे सांगत भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे.
या आंदोलनात माजी महापौर वंदना चव्हाण, बाळासाहेब शिरोळे, उल्हास ढोले-पाटील, शांतिलाल सुरतवाला, दत्ता एकबोटे, सुरेश शेवाळे, दत्ता गायकवाड, दीप्ती चवधरी, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, रजनी त्रिभुवन, मोहनसिंग राजपाल, विठलराव लड़कत, अंकुश काकडे आदी सर्व माजी महापौर उपस्थित होते.
पुढे पाहा, आंदोलनाची छायाचित्रे...