आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: अखिल भारतीय पत्रकारांचे जूनमध्ये भोसरीत अधिवेशन, देशभरातील तीन हजार पत्रकार येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 40 वे अखिल भारतीय अधिवेशन जूनमध्ये भोसरीत होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनास देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, वेब मीडियामधील सुमारे 3000 पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारद्वाज, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देशमुख म्हणाले की, 'पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांचे वेतन, पेन्शन याबाबतचे विषय परिसंवादात घेण्यात येणार आहेत. यात देशभरातील पत्रकार या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात 6 व 7 जूनला हे अधिवेशन होईल. या अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 जून रोजी सकाळी करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 7 जूनला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...