पुणे- खंडेरायाच्या जेजुरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा चालला होता. तब्बल 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ तोलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.
लाखो लोक होतात सामील
- या उत्सवादरम्यान जेजुरी हळदीने न्हाऊन निघते. जेजुरीचा हा उत्सव जगप्रसिध्द आहे.
- अनेक परदेशी नागरिकही हा सोहळा पाहण्यासाठी येतात.
- यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने यावेळी गड दुमदुमून निघतो.
- खंडोबाला शंकराचे अवतार म्हटले जाते. येथे भाविक डोंगरावर अनेक पायऱ्या चढून येतात.
जेजुरीचे ऐतिहासिक महत्व
- जेजुरीचे ऐतिहासिक महत्व आहे. या मंदिरात अनेक शिवाजी महाराज येत. ते अनेकदा शहाजी महाराजांसोबत येथे आल्याचे सांगण्यात येते.
- जेजुरीचे महत्व परराज्यातील नागरिकही मानतात. मध्य प्रदेशातील होळकर राजघराण्याचे ते कुलदैवत मानण्यात येते.
- येथील दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तलवार उचलण्याची ही परंपरा आजही कायम आहे.
- चैत्र, मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यात याठिकाणी यात्रा भरते.
- जेजुरीत दरवर्षी लाखो लोक खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात.
मुख्य द्वारावर आहे पितळी कासव
- या मंदिराचे दोन भाग असून पहिला भाग हा मंडपाचा आहे.
- दुसरा भाग हा गर्भगृह असून तेथे खंडोबाचे स्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथीय आहे. या मंदिरात 28 फूट आकाराचे पितळाचे कासव आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती