आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सत्तेत आल्यावर मावळ गोळीबाराची फेरचौकशी करणार- अमित शहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आल्यानंतर मावळ गोळीबाराची फेरचौकशी करू त्यात दोषींवर कडक कारवाई करू अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली.
मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळा भेगडे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात जाहीर सभा झाली. त्यावेळी शहा बोलत होते. यावेळी रामदास आठवले उपस्थित होते.
मावळ गोळीबारातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून शहा म्हणाले, शेतक-यांनी विरोध केल्यानंतर चर्चेने हा विषय सोडविण्याऐवजी येथील सरकारने गोळीबार केला. मावळ गोळीबारात तीन शेतक-यांचा जीव गेला. या गोळीबाराची जी चौकशी झाली त्याबाबत लोकांना शंका आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सत्तेत आल्यानंतर नव्याने या घटनेची फेरचौकशी करू. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मोदींच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा विकास करू शकेल असा मुख्यमंत्री निवडून द्यावा असे आवाहनही शहा यांनी केले.
मागील 15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकाराने महाराष्ट्र लुटून खाल्ला असे म्हणत शहांनी आघाडी सरकारवर तोफ डागली. शहा म्हणाले, सरकारने मागील काळातील हिशोब जनतेला दिला पाहिजे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून सहाव्या नंबरवर गेला आहे. देशाचा कृषीमंत्री राज्यातील असूनही हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सिंचन घोटाळ्यासारखे शेकडो घोटाळे राज्यात मागील सरकारने केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने 5 वेळा मुख्यमंत्री बदलले. विकासकामांसाठी सह्या न करणारे मुख्यमंत्री केवळ जाहिरातींमध्ये सह्या करताना दिसत आहेत. अशा सरकारला कायमचे घरी बसवा आणि विकासाला गतीमान करणा-या भाजपला संधी द्या असेही शहा यांनी आवाहन केले.