Home »Maharashtra »Pune» Amitabh Bacchan Get His Love At Pune FTII.

पुण्यात सुरु झाली होती अमिताभ-जयाची लव्हस्टोरी; FTII मध्ये आजही होते 'त्या' रोमान्सवर चर्चा

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन आपला 75 वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला अमिताभ आणि जया यांची लव्हस

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:28 PM IST

पुणे- बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन आपला 75 वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला अमिताभ आणि जया यांची लव्हस्टोरी घेऊन आलो आहे.

अमिताभ आणि जया यांची पहिली भेट पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) झाली होती. पहिल्या भेटीतच जया यांनी अमिताभ यांच्या मनात घर केले होते. टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ यांनी खुद्द याबाबत‍ खुलासा केला होता. आजही एफटीआयआय कॅम्पसमध्ये अमिताभ आणि जया यांच्या रोमान्सवर चर्चा होते.

अशी झाली अमिताभ आणि जयाची पहिली भेट...
- जया बच्चन या पुण्यात शिक्षण घेत होत्या. यादरम्यान अमिताभ बच्चन पहिला सिनेमा 'सात हिंदुस्तानी' (1969) साठी पुण्यात आले होते.
- जया बच्‍चन या अमिताभ यांना आधीपासूनच ओळखत होत्या. अमिताभ यांना पाहाताच जया यांच्या मैत्रिणी 'लंबू-लंबू' असे चिडवत होता. परंतु जया यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
- ऋषिकेश मुखर्जी यांनी आपला सिनेमा 'गुड्डी'साठी जया भादुरी आणि अमिताभ बच्चन या जोडीला कास्ट केले होते. परंतु, नंतर अमिताभ बच्चन यांना बाजुला केले होते.

ठेंगणी 'गुड्डी' आणि उंच नवरदेव...
- जया आणि अमिताभ यांची पहिली भेट ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गुड्डी' सिनेमाच्या सेटवर झाली होती. नंतर दोघे 1973 'जंजीर'मध्ये एकत्र दिसले होते.
- याच सिनेमा दरम्यान दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता.
- एका छोटेखानी समारंभात 3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया यांचा विवाह झाला होता.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अमिताभ आणि जया यांच्या विवाहाचे फोटो...

Next Article

Recommended