आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक संशोधन : लाइक्स वाढल्या म्हणजे मुड चांगला होत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डिजिटल युगात फेसबुक, व्हाॅट्सअॅप, ट्विटर या साेशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्यांवरच बहुतांश लाेकांचा भर असताे.  स्मार्टफाेन व संगणकावर अाधारित या संवादामुळे ग्रामीण- शहरी फरकही पुसला गेला अाहे. या पार्श्वभूमीवर साेशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची मानसिकता समजून घेणे महत्त्वपूर्ण बनले अाहे. विकासविषयक किंवा इतर राजकीय धाेरणे व कार्यक्रम ठरवताना त्यासंबंधीची नागरिकांची मते अाजमावणे राज्यकर्ते व प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरत अाहे. त्या दृष्टिकाेनातून प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) साेशल मीडियावरील माहितीच्या तत्काळ भावनिक विश्लेषणासाठी ‘ई-विदूर’ प्रणाली विकसित केली अाहे.
    
फेसबुक अाणि ट्विटरवरील माहितीचे परीक्षण अाणि या माहितीची म्हणजेच काॅमेंट्स, पाेस्ट इ.ची भावनिक पातळीवर वर्गवारी (सकारात्मक/नकारात्मक/ स्थितप्रज्ञ) थेटपणे करणे ‘ई-विदूर’ प्रणालीमुळे शक्य झाले अाहे. धार्मिक तेढ वाढवणारे, समाजविघातक कृत्ये करणारे लाेकही साेशल मीडियावर सक्रिय असल्याने त्यांच्या कॉमेंट्स, मते, पाेस्टस तत्काळ समजणे सामाजिकदृृष्ट्या अावश्यक अाहे. वापरकर्त्याने लिहिलेला मजकूर अाणि त्यातून ध्वनित हाेणारी त्याची मानसिकता यातील परस्पर संबंधांचे विश्लेषण करण्यासाठी या प्रणालीचा विकास करण्यात अाला अाहे. साेशल मीडियावरील माहितीचा साठा माेठा असून दरराेज ताे वाढतच अाहे. म्हणूनच या माहितीच्या भावनात्मक परीक्षणासाठी बिग डेटा ‘अॅनालिटिक्स न्यूराे लिंग्विस्टिक प्राेग्रॅमिंग’वर (एनएलपी) अाधारित प्रणालीचा यामध्ये वापर करण्यात अाला अाहे.     
 
ई-विदूर प्रणालीचे स्वरूप    
स्मार्ट सिटी, डिजिटल मनी यासारख्या सामाजिक उपक्रमांबाबत नागरिकांची मते जाणून घेणे धाेरण अाखणाऱ्यांसाठी गरजेचे असते. या प्रणालीत पाेलॅरिटी इन्फरन्स इंजिन नामक नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात अाला अाहे. साेशल मीडियावरील डेटामधून दिलेल्या विषयानुसार भावनिकतेची पातळी या तंत्राने अापाेअाप माेजली जाते व तिचे सकारात्मक/ नकारात्मक/ स्थितप्रज्ञ असे वर्गीकरण केले जाते. गुन्ह्याचा पुरावा मिळणे, ड्रगचे व्यापारी/ अतिरेकी इ.चा पत्ता लावणे, नेटवरील नागरिकांच्या (चालू घडामाेडी संदर्भातील) भावना व प्रतिसादांची उकल करणे, युजर प्राेफाइल्सचा तसेच दाेन वापरकर्त्यांदरम्यान परस्परसंबंध असल्यास ताे शाेधून त्यांच्या सामाईक कृती व मित्रपरिवार दर्शवणे अशा बाबी या माध्यमातून साध्य हाेऊ शकतात.     
दहशतवाद्यांवर वचक  
सी-डॅकचे संचालक हेमंत दरबारी यांनी सांगितले, ‘संशयास्पद नेटवर्क्सच्या साेशल मीडियावरील हालचाली, ट्विट्सचे भावानात्मक विश्लेषण व त्याबाबतचा कल अाेळखून सर्व परीक्षणे एकात्मिक पद्धतीने डॅशबाेर्डवर पायचार्ट, भाैगाेलिक माहितीसहित दाखवणे ‘ई-विदूर’मुळे शक्य अाहे. साेशल मीडिया वापरकर्त्यांच्या काॅमेंट्समधून विशिष्ट प्रकल्पासंबंधीच्या मतांची माहितीही मिळवता येऊ शकते. स्मार्ट सिटीची निवड करण्यासाठी   साेशल मीडियातील मतांची दखल घेण्यात अाली. एकाच शाेध माध्यमाद्वारे मीडियावरील माहितीचे डेटा क्राॅलिंगने परीक्षण करून व्यक्ती, ठिकाणे, संघटना याची माहिती काढणे व पडताळणी करणे साेपे झाले अाहे. दहशतवादी, अमली पदार्थ तस्कर, बेकायदेशीर वास्तव्य करणारे यांचीही माहिती याद्वारे मिळू शकते.
बातम्या आणखी आहेत...