आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या परदेशातील दौऱ्यांना पैसा कुठून येतो: काँग्रेस नेते आनंद शर्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सततच्या विदेश दौऱ्याची व्यवस्था करण्यासाठी कोणता समूह पैसा पुरवतो? त्यासाठी कोणती साधने वापरली जातात, असा खोचक सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना शनिवारी पुण्यात केला.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शर्मा म्हणाले, या निवडणुकीत काँग्रेस एक छोटा पक्ष आहे. निवडणुकीसाठी भाजप पक्षाचा चेहरा फक्त नरेंद्र मोदी हे असताना ते परदेशात का गेले? आम्ही भाजप अध्यक्ष अमित शहा कुठे आहेत याची चिंता कधी करत नाही. मात्र, भाजप हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काय करतात, कुठे जातात याबाबत चिंता करतात. त्याबाबतची सर्व माहिती पंतप्रधान मोदी, गृहमंत्री व सरकारला असते. राहुल गांधी हे बिघडलेले बाळ म्हणणाऱ्या भाजप खासदार एम.जे.अकबर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भविष्यात इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससाठी चांगले वातावरण असून या राज्यांमध्ये परिवर्तन नक्की होईल, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.

१९५० मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी धुडकावले होते, असे टि्वट भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नुकतेच केले होते. त्याबाबत शर्मा म्हणाले, काँग्रेस आणि पंतप्रधान मोदी हे सुब्रम्हण्यम स्वामी यांना गंभीर्याने कधी घेत नाही. १९५० मध्ये सुब्रम्हण्यम स्वामी संयुक्त राष्ट्र संघाचे जनरल सेक्रेटरी होते का? असा टोला त्यांनी या वेळी लगावला. राहुल गांधी यांना पक्षाचा उपाध्यक्ष व मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधी नेता निवडणे हा पक्षाचा एकमताने सामुहिक िनर्णय हाेता.