आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद जोशींच्या ‘अंगारवाटा’ वाचकांच्या भेटीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ दिवंगत नेते शरद जोशी यांचे जीवनचरित्र ‘अंगारवाटा…शोध शरद जोशींचा’ या नावाने ५ डिसेंबर रोजी वाचकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ संपादक, लेखक भानू काळे यांनी हे चरित्र लिहिले असून, शरद जोशींचे स्वत:चे संपूर्ण सहकार्य या लेखनासाठी मिळाले होते. त्यामुळे इतिहासातील एका देदीप्यमान कालखंडाचे हे दस्तएेवजीकरण ठरणार आहे. या समग्र चरित्राचे प्रकाशन शेतकरी संघटना न्यास व ऊर्मी प्रकाशन यांच्या वतीने होणार आहे. ५ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हे चरित्र प्रकाशित होईल.

डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सदानंद मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान समन्वय समितीचे अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग मान उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटना न्यासाचे अध्यक्ष रवी काशीकर यांनी या वेळी बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...