आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंपरी: रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची निर्घृण हत्या, टोळी वर्चस्वातून घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पूर्ववैनस्यातून पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे सराईत गुंड अनिकेत जाधवची डोक्यात दगड आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तो रावण सेना टोळीचा प्रमुख होता. ज्याने रावेत, आकुर्डी परिसरात दहशत माजवली होती. ही घटना सोमवारी मध्य रात्रीच्या 12 सुमारास आकुर्डी येथील शीतळादेवी मंदिराजवळ घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अनिकेत जाधव हा एका टोळीचा प्रमुख होता, याची दहशत रावेत,आकुर्डी भागात वाढत चालली होती. मात्र काल मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत वर दगडाने आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केली आहे. ही हत्या पूर्ववैनस्यातून झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी दिली आहे. अनिकेतवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

 

एक महिन्यापूर्वी रमाबाई वसाहत आकुर्डी येथे महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्यामध्ये फरार होता. मात्र त्याला काल रात्री याच महाकाली टोळीच्या सदस्या पैकीच कोणाचे तरी काम असावे असे प्राथमिक माहिती दिली आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...